ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन दोन दिवसांच्या भारत भेटीवर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटीनचे प्रधानमंत्री बोरिस जोहान्सन यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याची सुरुवात आज अहमदाबाद इथून झाली.ब्रिटिश प्रधानमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच  भारत दौरा आहे. गुजरातचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी प्रधानमंत्री जोहान्सन यांचे अहमदाबाद विमानतळावर भव्य स्वागत केले. प्रधानमंत्री जोहान्सन या दौऱ्यात गांधी आश्रम, गुजरात बायोटेकनॉलॉजी विद्यापीठ आणि अक्षरधामला भेट देणार आहेत. वडोदरा जवळील हलोल येथील जेसीबी कंपनीला भेट देऊन ते संध्याकाळी दिल्लीसाठी रवाना होतील. उद्या ब्रिटीनचे प्रधानमंत्री जोहान्सन प्रधानमंत्री मोदी  यांच्याशी परस्पर संबंध आणि  रणनितीक भागीदारी या विषयांवर द्विपक्षीय चर्चा होईल. २०३० साठी निर्धारित केलेल्या लक्ष्याच्या अंमलबजावणीचा दोन्ही प्रधानमंत्री आढावा घेतील. तसेच वेगाने बदलणाऱ्या जागतिक घडामोडींवर सुदधा या भेटीत चर्चा होईल.