मुंबई शेअर बाजारात घसरण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारांमधल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर देशातल्या बाजारांमधे आज एक टक्क्यापेक्षा जास्त घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवस अखेर ७०९ अंकांची घसरण झाली, आणि तो ५५ हजार ७७७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २०८ अंकांनी घसरुन १६ हजार ६६३ अंकांवर बंद झाला.