उद्योग विभागातर्फे उत्कृष्ट निर्यातदारांचा राज्य पुरस्काराने २४ मार्चला होणार सन्मान

  जळगाव जिल्हयातील कोणतेही नागरिक, विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा

मुंबई : राज्य शासनाच्या उद्योग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट निर्यातदार या पुरस्कारांचे वितरण २४ मार्च २०२२ रोजी होणार आहे. २०१७-१८ या वर्षासाठी निवड झालेल्यांना हा पुरस्कार मुंबई येथील जागतीक व्यापार केंद्र येथे कार्यक्रमात देण्यात येणार असल्याचे उद्योग संचालनालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

राज्य शासनाच्या उद्योग विभागातर्फे राज्यातील उत्कृष्ट निर्यातदारांचा गौरव करण्यात येतो. २०१७-१८ या वर्षासाठी उत्कृष्ट निर्यातदार पुरस्कारांची निवड करण्यात आली होती. या पुरस्कारांचे वितरण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते व उद्योग राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, अपर मुख्य सचिव (उद्योग) तसेच विकास आयुक्त (उद्योग) तथा निर्यात आयुक्त यांच्या उपस्थितीत मुंबईच्या जागतिक व्यापार केंद्र येथे २४ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image