राज्य सरकारनं आज मांडलेला अर्थसंकल्पातून सर्वच घटकांची घोर निराशा - देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं मांडलेला अर्थसंकल्पातून सर्वच घटकांची घोर निराशा झाली आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पातून राज्याला कोणतीही नवी दिशा मिळालेली नाही, हा अर्थसंकल्प केवळ काही मतदारसंघांपुरता आणि केवळ काही नेत्यांपुरता आहे असं फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. 

या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणारी कोणतीही घोषणा नाही, अशी टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. सरकारनं भाजपा सरकारच्या कार्यकाळातल्या योजनांचा विस्तार करून, त्याचं श्रेय लाटायचं काम केलं आहे असं दरेकर यांनी म्हटलं आहे.