उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपुर, उत्तराखंड विधानसभा निवडणूकांच्या मतमोजणीला उद्या पासून सुरुवात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपुर, उत्तराखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची मतमोजणी उद्या होत आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.  या बरोबरच काही पोटनिवडणूकांचीही मतमोजणी उद्या होणार असून मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होईल. मतदार संघ निहाय निवडणूकांचे निकाल आणि कल निवडणूक आयोगाच्या संकेतस्तळावर आणि अॅपवर ताबडतोब उपलब्ध होणार आहेत. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या ठिकाणी कोविड नियमांचं पालन करण्यात येणार असून याची अंमलबजावणी करण्यासाठी एका विशेष अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. याचबरोबर कोणत्याही उमेदवाराला किंवा त्यांच्या पोलिंग एजंटना मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार नाही. मतमोजणी केंद्राच्या बाहेर लोकांनी गर्दी करण्यावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. शारिरिक अंतराचं पालन करण्यासाठी यावेळी मोठ्या मतमोजणी केंद्राची उभारणी करण्यात आली असून मतदान यंत्रालाही निर्जंतुक करण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाच्या तापमानाचीही नोंद करण्यात येणार आहे.  निवडणूक आयोगानं या राज्यांमधल्या विजयी मिरवणूकांवर याआधीच निर्बंध घातले आहेत. पाच राज्यांमधल्या एकूण ६९० जागांसाठीची ही मतमोजणी होणार आहे. आकाशवाणीच्या या राज्यातल्या केंद्रावरुन निवडणूक निकालाची माहिती देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक निकालांची क्षणाक्षणाला माहिती देण्याबरोबरच तज्ञांची मतं जाणून घेता येणार आहेत. 

 

 

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image