सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यात ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावेल – वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख

  सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यात ‘दोन वर्षे जनसेवेची,  महाविकास आघाडीची’ प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावेल – वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख

मुंबई : गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने विविध लोकाभिमुख निर्णय घेतले असून या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पेनवरील प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केला.

मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या संकल्पनेवर आधारित चित्रमय प्रदर्शन आयोजित केले आहे, या प्रदर्शनाला वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भेट देऊन पाहणी केली, आणि ३६० डिग्री सेल्फी पॉईट येथे त्यांनी आपला व्हिडिओ चित्रित करुन घेतला. बंदरे विकास, वस्त्रोद्योग आणि मत्स्यव्यवसाय विकास विभागाने घेतलेल्या निर्णयांची माहिती चित्रबद्ध करुन प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. या वेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) गणेश रामदासी, संचालक (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रदर्शने) श्रीमती सीमा रनाळकर यांचेसह अधिकारी उपस्थित होते.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image