रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम खतं व्यवसायावर पडण्याची शक्यत्ता

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम राज्यातल्या खतं व्यवसायावर पडण्याची शक्यत्ता तज्ञांकडून व्यक्त होत आहे. शेतक-यांनी आगामी खरीप हंगामासाठी आधीच खतं खरेदी करण्याचं आवाहन अकोला जिल्हा कृषी विभागानं केलं आहे. रशिया हा पोटॅश, फॉस्फेट आणि नायट्रोजनयुक्त खतांचा निर्यातदार देश आहे. राज्यात शेतीसाठी सर्वाधिक पोटॅश खताची मागणी असल्यामुळे खरीपासाठी दोन लाखांवर मेट्रिक टन खताच्या मागणीचा अंदाज विभागानं व्यक्त केला आहे. दरम्यान खतांचे दर वाढत असल्यानं शेतक-यांना आर्थिक फटका सहन करावा लागेल.