‘संडे स्ट्रिट’ या उपक्रमाअंतर्गत मुंबईत काही रस्ते आणि मार्ग सकाळी ४ तासांसाठी बंद ठेवले जाणार

 



मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत पोलिसांच्या पुढाकारानं रविवारी काही रस्ते आणि मार्ग स्थानिक नागरिकांना योगा, सायकल चालवणे, चालणे, स्केटिंग तसंच काही क्रीडा प्रकार करायला मिळावे या उद्देशानं सकाळी ४ तासांसाठी बंद ठेवले जाणार आहेत. ‘संडे स्ट्रिट’ या उपक्रमाअंतर्गत नागरिकांसाठी हा निर्णय घेतल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्यानं दिली आहे. आपल्या प्रियजनांसोबत घराबाहेर पडत व्यायाम, मनोरंजन, क्रीडा प्रकार,शारीरिक स्वास्थ्य अनुभवायला मिळावं यासाठी हा निर्णय घेतला आहे. येत्या रविवारी नरिमन पॉईंट इथला दोरा भाई टाटा मार्ग, वांद्रे इथं कार्टर रोड, गोरेगावात माइंडस्पेस रोड, अंधेरीच्या डी एन नगर मधला लोखंडवाला मार्ग, मुलुंड मधील तानसा पाईप लाईन आणि विक्रोळीतला पूर्व द्रुतगती महामार्ग उद्या सकाळी सहा ते दहा दरम्यान वाहनांसाठी बंद ठेवत. पूर्णपणे स्थानिक नागरिकांसाठी खुले ठेवले जाणार आहेत. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image