शहरातील दळणवळण व्यवस्था आणखी सक्षम करणार : आ. महेश लांडगे

 

भोसरी ते घोडेगाव पीएमपी बससेवा सुरू

पिंपरी : शहर आणि परिसरातील रस्ते व दळणवळण व्यवस्था उत्तम असेल तर उद्योग, व्यवसाय व रोजगार वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील दळणवळण व्यवस्था आणखी सक्षम करणार आहे असे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले.

रविवारी (दि. 13 मार्च) भोसरी बसस्थानकामध्ये  मार्ग क्रमांक ३६४ भोसरी ते घोडेगांव (व्हाया मंचर, निघोटवाडी, लांडेवाडी) या पीएमपी बस मार्गाचा लोकार्पण सोहळा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे तसेच शांताराम वाघेरे, रमेश चव्हाण, काळुराम लांडगे, कुंदन काळे, रमेश गवळी, विलास पाडाळे, विजय आसादे व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.

या मार्गाचे एकूण अंतर ६१ किलोमिटर व प्रवास भाडे एकामार्गाचे ६० रुपये आहे. दिवसभरात एकूण आठ फेऱ्या होणार आहेत. या मार्गाचा उपयोग कामगार, विद्यार्थी, शेतकरी यांना होईल. 

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image