महाज्योती संस्थेमार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मुलींकरिता निवासी प्रशिक्षण केंद्रास २४ कोटी रूपयांची तरतूद

 

मुंबई : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगांव मौजे नायगांव येथे महाज्योती संस्थेमार्फत 200 मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) व अन्य स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निवासी स्पर्धा प्रशिक्षण संकुल उभारणे. सर्व सोयी सुविधेसह प्रशिक्षण केंद्र सुरु करणे व चालविणे याकरिता 24 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे, यासंदर्भातील शासन निर्णय 7 मार्च रोजी जारी करण्यात आला आहे.

महाज्योती ही स्वायत्त संस्था असून विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर वंचित व दुर्लक्षित घटकातील युवक व युवतींसाठी विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी महाज्योती या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती संस्थेने दिलेल्या प्रस्तावानुसार 100 विद्यार्थिनींची निवास व्यवस्था सर्व अत्याधुनिक सुविधांसह उभारण्यासाठी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील उजव्या बाजूस खुल्या जागेत 100 विद्यार्थिनीकरिता 50 रूम बांधण्यासाठी 30 लाख रूपये, 100 विद्यार्थिनींना निवासाची व्यवस्था करणे रूम फर्निचर व सुविधा यासाठी एकूण 50 रुममध्ये प्रत्येकी 2 टेबल, खुर्च्या, कपाट, कॉट गाद्यांकरिता 5 लाख रूपये, इमारत डागडुजी बाथरूम, रंगकाम, इलेक्ट्रीक व इतर बाबी (CCTV, अग्नीशमन यंत्रणा, इत्यादी) या करिता अंदाजित 10 लाख रूपये, कार्यालयीन सोयी-सुविधा व उपकरणे, टेबल, खुर्च्या, कपाट, संगणक, इंटरनेट सुविधा, रंगकाम, इलेक्ट्रिकल व इतर बाबीसाठी (CCTV, अग्नीशमन यंत्रणा, इत्यादी) याकरिता 10 लाख रूपये, मेस उभारणी, डायनिंग टेबल, खुर्च्या सेट, केटरर्स व्यवस्था जेवणथाळ्या वाट्या, ग्लास, चमचे इत्यादी साहित्यसंपूर्ण व्यवस्था करणे याकरिता अंदाजित 10 लाख रूपये, डिजिटल क्लासरुम व्यवस्था, 3 क्लासरूम मधील डेस्क बेंच, प्रोजेक्टर, Inter- active पॅनेल, टेबल, इंटरनेट सुविधा व इतर बाबी  १० लाख रूपये खर्च,वाचनालय व अभ्यासिका, 50 बैठक व्यवस्थेसह टेबल, खुर्च्या, पुस्तक कपाट, संगणक, इंटरनेट सुविधा, रंगकाम, इलेक्ट्रिकल व इतर बाबी (CCTV, अग्नीशमन यंत्रणा, इत्यादी याकरिता अंदाजित  20 लाख रूपये, वाचनालय व अभ्यासिका करीता पुस्तक खरेदी, एकूण 1 लक्ष पुस्तके अभ्यासिकेकरिता 20 लाख रूपये, प्रशिक्षणासाठी मैदान व्यवस्था तयार करण्यासाठी अंदाजित 10 लाख रूपये, सुसज्ज व्यायाम शाळा बांधणी, व्यायाम शाळा उभारणी व साहित्य खरेदी करणे या करिता 10 लाख रूपये, सभागृह बांधणी, प्रेक्षागृह उभारणी व इतर आवश्यक बैठक व्यवस्था व साउंड व्यवस्था याकरिता 45 लाख रूपये,प्रशिक्षणासाठी नवीन जमीन खरेदी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेच्या शेजारी लागून असलेली मोकळी जागा याकरीता. 60 लाख रूपये  असे एकूण सर्व कामांसाठी  एकूण अंदाजित खर्च 24 कोटी रूपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

Popular posts
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व पसार उपक्रमांतर्गत प्रबोधनपर्व
Image
एमटीडीसीमार्फत विशेष सवलतींची व पर्यटनस्थळांची माहिती देणारे दालन पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वाचे – पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती सुनील तटकरे
Image
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू
Image
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची ८० धावांपर्यंत मजल
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image