युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात कच्च्या तेलाची टंचाई भासणार नाही, अशी केंद्र सरकारची ग्वाही

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी केंद्रसरकार घेईल, असं पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यम प्रतिनिधींना सांगितलं. युक्रेनमधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंधन तेलाबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. देशातल्या एकूण गरजेच्या ८५ टक्के इंधन तेल आणि ५५ टक्के इंधन वायू आयात असतो.

आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम त्यांच्या किंमतीवर होत असतो आणि त्याचे दर तेल कंपन्या ठरवतात असं पुरी म्हणाले. ५ राज्यातल्या विधानसभा निवडणुका होणार होत्या म्हणून इंधन दरवाढ थोपवण्यात आल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला. इंधन दराबाबतचा निर्णय सर्वस्वी तेल विपणन कंपन्यांचा असतो असं त्यांनी स्पष्ट केलं.