को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी चित्रा रामकृष्ण यांना अटक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एनएएसई अर्थात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामाकृष्णा यांना सीबीआयनं अटक केली आहे. को-लोकेशन घोटाळा प्रकरणी सीबीआयनं काल त्यांनी चौकशीसाठी बोलावलं आणि नंतर अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाईल. याप्रकरणी त्यांना सेबीनं ३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.