विधानपरिषदेतून निवृत्त होणाऱ्या १० सदस्यांना सभागृहातून निरोप

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेतून
निवृत्त होणाऱ्या १० सदस्यांना आज सभागृहातून निरोप देण्यात आला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह जेष्ठ सदस्य दिवाकर रावते , सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, प्रसाद लाड, संजय दौंड या सदस्यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात तर रवीन्द्र फाटक यांचा कार्यकाळ जून  महिन्यात संपत आहे . या सदस्यांना निरोप देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवृत्त होणाऱ्या सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.