आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत संरक्षण सामग्रीच्या उत्पादनासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यावर केंद्र सरकारचा भर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत संरक्षण सामग्रीच्या उत्पादनासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी आज  लोकसभेत सांगितलं. संरक्षण खात्याच्या  अंदाजपत्रकातील खर्च संरक्षण क्षमतांचा विकास,तसच आधुनिकीकरण लक्षात घेऊन केला जातो.  २०१३-१४ मध्ये संरक्षण आर्थिक तरतूद २ लाख ५३ हजार ३४६ कोटी इतकी होती.  २०२२-२३ मध्ये ती ५ लाख २५ हजार १६६ कोटी रुपये इतके झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. जगात भारताचा संरक्षण खर्चसंदर्भात तिसरा क्रमांक लागतो, अशी माहिती संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी यावेळी दिली. संरक्षण दलाचं आधुनिकीकरण करण्यासाठी निधीची कमतरता नसल्याचं ही भट्ट यांनी यावेळी सांगितलं. 

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image