देवेंद्र फडनवीस यांना सायबर विभागाकडून नोटीस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई पोलिसांच्या सायबर विभागानं  विरोधीपक्षनेते देवेंद्र फडनवीस यांना जबाब नोंदवण्यासाठी उद्या उपस्थित राहण्यासंबंधी नोटीस बजावली. सायबर पोलिसांनी  दाखल केलेलल्या एका गुन्ह्यात फडनवीस यांना काही माहिती नोंदवण्यासाठी पोलिसांनी प्रश्नावली पाठवली होती. या बाबत फडनवीस यांनी उत्तर न दिल्यामुळे पोलिसांनी उद्या मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथं सायबर पोलिसांच्या मुख्यालयात हजर राहायला सांगितलं आहे.  

विरोधी पक्ष नेता म्हणून असलेल्या अधिकारातून आपण सत्ताधाऱ्यांचे घोटाळे बाहेर काढू शकतो असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  आपल्याला कुणीही या माहितीचा स्रोत विचारू शकत नाही, तसा नियमच आहे असं त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकारच्या गृहमंत्रालयातील महाघोटाळ्यासंदर्भात आपल्याला चौकशीसाठी बोलावलं असून पोलीसांसमोर हजर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

फोन टॅपिंग प्रकरणात पोलिसांनी फडणवीस यांना नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज माध्यमांशी बोलत होते. आपण विरोधी पक्षनेते असल्यानं पोलिस आपल्याला माहितीचा स्त्रोत विचारू शकत नसून  पोलिसांनी सहाय्य मागितल्यानं आपण ते देत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.