राज्यात काल कोविड १९ मुळे एकाही रुग्णाच्या मृत्युची नोंद नाही

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड १९ मुळे एकाही रुग्णाच्या मृत्युची नोंद झाली नाही. काल राज्यात ५४४ नव्या रुग्णांची नोंद झाली, १ हजार ७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ६६ हजार ९२४ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७७ लाख १३ हजार ५७५ रुग्ण बरे झाले, तर १ लाख ४३ हजार ७०६ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ५ हजार ६४३ एक्टीव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ५ शतांश टक्के झाला आहे, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या ३८ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ३७ रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रात, तर एक रुग्ण औरंगाबादमधे आढळला. राज्यात आतापर्यंत एकूण ४ हजार ७७१ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी आतापर्यंत ४ हजार ६२९ रुग्ण बरे झाले आहेत.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image