निर्धारित वेळेच्या आधी चारशे अब्ज अमेरिकी डॉलरची भारताची निर्यात, प्रधानमंत्र्यांकडून कौतूक

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं चारशे अब्ज अमेरिकी डॉलर निर्यातीचं लक्ष साध्य करून एक इतिहास रचला आहे. निर्धारित वेळेच्या नऊ दिवस आधीच भारतानं हे यश प्राप्त केलं आहे. देशानं हे महत्वाकांक्षी लक्ष प्रथमच गाठलं असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाद्वारे सर्वांचं अभिनंदन केलं आहे. देशातले शेतकरी, विणकर, उत्पादक आणि निर्यातदारांचं हे यश आहे तसंच आत्मनिर्भरतेच्या दिशेनं देशाच्या सुरु असलेल्या वाटचालीत हा मैलाचा दगड ठरला आहे, अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी देशातल्या कष्टकऱ्यांचा गौरव केला आहे.