भारतीय ४ खेळाडूंचा जर्मन ओपन बैडमिंटन टूर्नामेंटच्या २ टप्प्यात प्रवेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पी.वी. सिंधु, किदांबी श्रीकांत, साइना नेहवाल आणि लक्ष्य सेन यांनी बर्लिन येथे होत असलेल्या जर्मन ओपन बैडमिंटन टूर्नामेंटच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. महिला एकेरीमध्ये पी.वी. सिंधु हिनं थायलंडच्या बुसानन ओंगबाम-रुंगफानला आणि साइना नेहवाल हिने स्पेनच्या क्लारा एज़ुरमेंडी विरुद्ध सामना जिंकला. पुरुष एकेरीमध्ये किदाम्बीस श्रीकांतने फ्रांसच्या ब्राइस लीवरडेज़शी लढत दिली तर लक्ष्य सेन याने थायलंडच्या कैंटाप्होन वांगचारोएन याला हरवून स्वतःचा विजय अंकित केला. एच.एस. प्रणय यानं विजया बरोबरच नवीन क्रीडा अभियानाला सुरुवात केली. त्याने नका लोंग एंगस याला हरवले. त्याला आता इंडोनेशियाच्या शेसर हिरेन रुस्तवितो आणि मलेशियाचा ली चेउक यिउ या खेळाडूंबरोबर सामना खेळावा लागेल