देशाचा कोरोना मुक्तीदर ९८ पूर्णांक ७३ शतांश टक्के

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल २ हजार ५२८ कोरोनाबाधितांची नोंद झाली तर ३ हजार ९९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आत्तापर्यंत देशभरातले ४ कोटी २४ लाख ५८ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याबरोबरच देशाचा कोरोना मुक्तीदर ९८ पूर्णांक ७३ शतांश टक्के झाला आहे. सध्या देशभरात २९ हजार १८१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे.