जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधे श्रीनगरच्या रैनावरी परिसरात आज पहाटे झडलेल्या चकमकीत सुरक्षा दलानं लष्कर ए तैबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यांच्याकडून शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केल्याचं काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितलं. नागरिकांच्या हत्येबरोबरच अलीकडे झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमधे या दोघांचा हात होता. एका दहशतवाद्याकडे प्रसारमाध्यमात काम करत असल्याचं ओळखपत्रही सापडल्याची माहिती त्यांनी दिली.