इस्रायलच्या एशिया पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल हर्पाज यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

 

मुंबई (वृत्तसंस्था) : इस्रायलच्या एशिया पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल हर्पाज यांनी काल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन इथं भेट घेतली. मराठवाड्यातल्या पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी इस्रायलमधली राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी महत्वाकांक्षी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार करत आहे, कोरोनामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला आहे, तो पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य शासनानं इस्रायलला सहकार्य करावं अशी विनंती इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी यावेळी राज्यपालांना केली. इस्रायलचा जलव्यवस्थापन प्रकल्प मराठवाड्यासाठी निश्चितच वरदान ठरेल असं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यावेळी म्हणाले. या बैठकीला इस्रायलचे मुंबईतले वाणिज्यदूत कोबी शोशानी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image