विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्याचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. आज नियमित कामकाज सुरू होताच, भाजपाचे जेष्ठ सदस्य विजय गिरकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर हे मजूर संस्थेतून निवडून आलेले नाहीत असं सांगत आघाडी सरकार सूडाचं राजकारण करत आहे, असा आरोप गिरकर यांनी केला. यावेळी विरोधी पक्षसदस्य आक्रमक झाले. त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरु केली.यासंदर्भात सरकारकडून माहिती घेऊन ती सभागृहासमोर ठेवली जाईल असं सभापतींनी सांगितलं. मात्र विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला. त्यामुळे कामकाज २५ मिनिटांसाठी स्थगित करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतरही विरोधक याप्रश्नी आक्रमक राहिले.  त्यामुळे कामकाज पुन्हा एकदा 20 मिनिटांसाठी तहकुब करावं लागलं. त्यानंतरही कामकाज सुरु झाल्यावर विरोधी आणि सत्ताधारी सदस्य हौद्यात उतरले, आणि एकमेकांविरोधात घोषणा दिल्या, दरेकर यांना अटक करावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी यावेळी केली. गोंधळ कायम राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image