शहीद चंद्रशेखर भोंडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सैन्यदलात जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर असतांना वीरगती प्राप्त झालेल्या लान्स नायक चंद्रशेखर रूपचंद भोंडे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात वैनगंगेच्या दहनघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी १४ वर्ष देशसेवेचं कर्तव्य बजावलं होते. शहीद चंद्रशेखर भोंडे यांचं पार्थिव आज सकाळी भंडाऱ्यातील त्यांच्या निवासस्थानी आलं. अंत्ययात्रेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला.