जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या संदर्भात भारताच्या सुरक्षा सज्जतेचा आणि प्रचलित जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, प्रधानमंत्र्याचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, संरक्षण सचिव, परराष्ट्र सचिव या बैठकीला उपस्थित होते.