भाजपाचे नेते प्रसाद लाड यांना अटकेपासून अंतरीम संरक्षण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राट घोटाळ्यातील एका प्रकरणात भाजपाचे नेते प्रसाद लाड यांना मुंबई उच्च न्यायालयानं अटकेपासून अंतरीम संरक्षण दिलं आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं लाड यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. दरम्यान, विकासक बिमल अग्रवाल यांनी लाड यांच्याविरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी लाड यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि एस. एम. मोदक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.