चीनमधून होणाऱ्या खेळणी, खेळ, आणि क्रीडा साहित्याच्या आयातीत घट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधून होणाऱ्या खेळणी, खेळ, आणि क्रीडा साहित्याच्या आयातीत घट होत असल्याचे सरकारने म्हटले आहे. चीनमधून या उत्पादनांची आयात २०१८-१९ मध्ये ४५१ दशलक्ष डॉलर्सवरून २०२१ मध्ये सुमारे २०६ दशलक्ष डॉलर्सवर आली आहे. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.त्या म्हणाल्या की, स्वस्त आणि दर्जेदार खेळण्यांच्या आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, परकीय व्यापार महासंचालनालयाने प्रत्येक मालावरील नमुना चाचणी अनिवार्य केली आहे.

ही चाचणी अयशस्वी झाल्यास, माल एकतर परत पाठविला जातो किंवा आयातदाराच्या खर्चाने नष्ट केला जातो.सरकारने खेळणी गुणवत्ता नियंत्रण आदेश, २०२० देखील जारी केला आहे त्याद्वारे खेळण्यांना भारतीय मानक ब्युरोचं प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे.