विधानसभा निवडणूकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधे भाजपाची सत्ता कायम

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपानं उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधे सत्ता कायम राखली, तर पंजाबमधे आम आदमी पार्टीनं निर्णायक बहुमत मिळवलं. या राज्यांमधले सर्व निकाल स्पष्ट झाले असून, पक्षनिहाय बलाबल असं आहे. उत्तर प्रदेशात भाजपानं ४०३ पैकी २५५ जागा जिंकल्या आहेत, तर त्यांच्या मित्रपक्षांपैकी अपना दलनं १२, तर निषादनं ६ जागा जिंकल्या आहेत. समाजवादी पार्टीनं १११ तर त्यांच्या मित्रपक्षांपैकी राष्ट्रीय लोकदल-८  आणि सुहेलदेव भारतीय समाजपार्टीनं ६ जागा मिळवल्या आहेत. जनसत्तादल आणि लोकतांत्रिक या पक्षांनी प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला आहे. कॉंग्रेसला दोन, तर बसपाला फक्त १ जागा जिंकता आली. उत्तराखंड- एकूण जागा ७०, भाजपा ४७, कॉंग्रेस १९, बसपा आणि अपक्ष प्रत्येकी २, गोवा - एकूण जागा ४०. भाजपा २०, कॉंग्रेस ११, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि आम आदमी पार्टी प्रत्येकी २, रिवोल्युश्नरी गोवन्स पार्टी १ आणि अपक्ष ३. मणिपूर - एकूण जागा ६०. भाजपा ३२,  नॅशनल पीपल्स पार्टी ७, जनता दल संयुक्त ६, कॉंग्रेस ५, नागा पीपल्स फ्रंट ५, कुकी पीपल्स अलायन्स २, अपक्ष ३. पंजाब - एकूण जागा ११७. आप ९२, कॉंग्रेस १८, शिरोमणी अकाली दल ३, भाजपा २, तर बसपा आणि अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी १ जागा जिंकली आहे.