जवळपास एक लाख युवकांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे - धर्मेंद्र प्रधान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक लाख युवकांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही योजना सुरू केल्याची घोषणा केली.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या संकेत स्थळावर नोंदणी करून या संधीचा फायदा घेऊ शकतात. या द्वारे विद्यार्थ्यांना एखादा उद्योग कशा प्रकारे कार्य करतो याची पूर्ण माहिती मिळू शकेल, असंही त्यांनी सांगितलं. युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी पुढच्या तीन वर्षात १० कोटी इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करण्याचा सरकारचा इरादा आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे युवकांना रोजगारभिमूख शिक्षण मिळेल, ज्यामुळे हे युवक पुढच्या आव्हानांसाठी तयार असतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.