देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिल्या १७९ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त मात्रा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १७९ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ८० कोटी ६९ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर १ कोटी ९७ लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ८ कोटी ८२ लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून ७ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आज सकाळपासून ५२ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १५ कोटी ७१ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ६ कोटी ८० लाखापेक्षा जास्त नागरिकांना लशींच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर १६ लाख पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना एकूण ५७ लाख ८४ हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.

Popular posts
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व पसार उपक्रमांतर्गत प्रबोधनपर्व
Image
एमटीडीसीमार्फत विशेष सवलतींची व पर्यटनस्थळांची माहिती देणारे दालन पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वाचे – पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती सुनील तटकरे
Image
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू
Image
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची ८० धावांपर्यंत मजल
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image