नागपूरात पहिल्यांदाच एरोमॉडेलिंग शोचे आयोजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज नागपूरात राष्ट्रीय छात्र सेना, तसेच विविध हौशी एरोमॉडेलर्स संस्थांच्या सहकार्याने पहिल्यांदाच एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले होते. एरोमोडीलिंग शो चे उदघाटन क्रीडा मंत्री सुनील केदार यांचा हस्ते करण्यात आले, यावेळी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, आमदार विकास ठाकरे, अभिजित वंजारी, यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

मुलांनी कॉम्प्युटर आणि वॉटसप चा बाहेर पडून क्रीडा क्षेत्राकडे वळावे असं आवाहन क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी यावेळी केले. यावेळी हॉर्स रायडिंग ची आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी हॉर्स रायडींगचे प्रात्यक्षिक एनसीसी पथकाद्वारे सादर करण्यात आले .या मध्ये विविध प्रकारच्या 20 एरोमॉडेल्सचे प्रात्यक्षिक एनसीसी आणि  हौशी एरोमॉडेलिंगचा मुलांनी यावेळी सादर केले. एरोमॉडेलिंग शो बघण्यासाठी हजारो विध्यार्थी, पालकांनी मोठी गर्दी केली होती.