परदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयानं सुधारित मार्गदर्शक सूचना काल जारी केल्या. या महिन्याच्या १४ तारखेपासून ही नियमावली लागू करण्यात येणार आहे. RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अपलोड करण्याऐवजी संपूर्ण प्राथमिक लसीकरण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र अपलोड करण्याचा पर्याय आता प्रवाशांना मिळणार आहे.

ज्या देशांमध्ये भारतीय लसीचं प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जातं अशा देशातील प्रवाशांसाठीच हा नियम लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे या नवीन नियमावलीनुसार विमानतळावर आगमन झालेल्या कुठल्याही २ टक्के प्रवाशांची चाचणी केली जाणार आहे. अशा प्रवाशांची निवड संबंधित विमान कंपन्यांकडून सरसकट केली जाणार आहे.

चाचणीचे नमुने दिल्यानंतर अशा प्रवाशांना लगेच घरी जाण्याची परवानगी देखील आता दिली आहे. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आगमनानंतर ७ दिवसांचं गृहविलगीकरण आता बंधनकारक नसेल; त्याऐवजी आता १४ दिवस स्वतःचं आरोग्य निरीक्षण करणं अनिवार्य असल्याचं या तत्त्वांची मुख्य वैशिष्ट्ये अधोरेखित करताना आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी स्पष्ट केलं.

जोखीम गटातले देश ही श्रेणी सुद्धा आता रद्द करण्यात आली असून आगमनानंतर ८ व्या दिवशी करावी लागणारी RT-PCR चाचणी आणि Air Suvidha portal वर त्याचा अहवाल अपलोड करणं देखील आता बंधनकारक नसणार आहे. सर्वांना या मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आणि या लढाईत देशाला पाठिंबा देण्याचं आवाहन मांडवीय यांनी केलं आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image