राज्यातल्या कोरोना दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ च्या दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ७६ शतांश टक्के झाला आहे. राज्यात काल ६ हजार ४३६ नव्या रुग्णांची नोंद झाली. १८ हजार ४२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर २४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ७८ लाख १० हजार १३६ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७५ लाख ५७ हजार ३४ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४३ हजार ९८ रुग्ण दगावले. राज्यातला मृत्यूदर १ पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. सध्या राज्यात १ लाख ६ हजार ५९ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. राज्यात कालही ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.