देशातल्या खनिजसंपन्न राज्यांच्या खनिकर्म आणि उद्योग मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक कोणार्क इथं सुरु

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या खनिजसंपन्न राज्यांच्या खनिकर्म आणि उद्योग मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक आज ओदिशात कोणार्क इथं सुरु होत आहे. केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. केंद्रीय पोलाद आणि ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते उद्या बैठकीला संबोधित करतील. महाराष्ट्राखेरीज आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान आणि ओदिशा ही राज्यं बैठकीत सहभागी आहेत. खनिज उत्पादनाचे भाडेकरार, पर्यावरण आणि वनविभागाच्या परवानग्या इत्यादी विषयात राज्य आणि केंद्रसरकार दरम्यान ताळमेळ राखण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा होईल.