देशात काल बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांपेक्षा दुपटीपेक्षा जास्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : देशात काल बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांपेक्षा दुपटीपेक्षा जास्त होती देशात काल ६७ हजार ५३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशात या आजारातून मुक्त झालेल्यांची एकूण संख्या ४ कोटी १९ लाख १० हजार झाली आहे. देशात काल ३० हजार ७५७ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या देशात ३ लाख ३२ हजार ९१८ रुग्ण उपचाराधीन आहेत. देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ३ शतांश टक्के झालं आहे. देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देशभरात १७४ कोटी ३५ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ७६ कोटी ४३ लाख नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या आहेत. तर १ कोटी ७३ लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ७ कोटी १६ लाखांपेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून १७ लाख ७३ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image