अमेरिकेनं रशियावर लादले काही निर्बंध

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाची आर्थिक कोंडी करण्याच्या दिशेने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी काल आर्थिक निर्बंधांची पहिली फेरी जाहीर केली. त्यानुसार आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण करणाऱ्या स्विफ्ट यंत्रणेशी रशियाचा संपर्क तोडण्यात आला आहे.

याचा परिणाम रशियाची मध्यवर्ती बँक आणि तिथल्या काही धनवंतांवर होणार आहे. युरोपीय संघाने रशियावर दडपण आणण्यासाठी निर्बंध जाहीर केल्यानंतर त्यांच्याशी ताळमेळ राखून इतरही अनेक निर्बंध अमेरिकेने जाहीर केले आहेत. रशियाने आक्रमण चालूच ठेवल्यास आणखी कडक निर्बंधांना तोंड द्यावं लागेल असं बायडन यांनी बजावलं आहे.