राज्यात काल कोरोनाच्या २ हजाराहून कमी रुग्णांची नोंद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १ हजार ९६६ नव्या रुग्णांची नोंद झाली. ११ हजार ४०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ४४ हजार ९१५ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७६ लाख ६१ हजार ७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर १ लाख ४३ हजार ४१६ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ३६ हजार ४४७ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६६ शतांश टक्के झालं आहे, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले ८ रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण मुंबईत आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत ३ हजार ९९४ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी आतापर्यंत ३ हजार ३३४ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत काल कोविड-१९ चे १९२ नवे रुग्ण आढळले. तर ३५० रुग्ण बरे झाले. मुंबईत आतापर्यंत १० लाख ३२ हजार १८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, कोरोनामुक्तीचा दरर ९८ टक्के आहे. मुंबईत सध्या २ हजार ५१३ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. रुग्णवाढीचा दर ४ शतांश टक्के आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी १ हजार ६९१ दिवसांवर गेला आहे.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image