वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत ४४ धावांनी विजयी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर ४४ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वेस्ट इंडिजपुढं विजयासाठी २३८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. सुर्यकुमार यादवनं ६४, तर के एल राहुलनं ४९, धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताला निर्धारित ५० षटकात ९ बाद २३७ धावा करता आल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ ४६ व्या षटकात १९३ धावांवर गारद झाला. प्रसिद्ध कृष्णानं ४ गडी बाद केले. त्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.