चारा घोटाळ्याप्रकरणी आणखी एका खटल्यात लालू प्रसाद यादव दोषी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित चारा घोटाळ्यात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना झारखंडच्या दोरांडा कोषागारातून १३९ कोटी ३५ लाख रुपये बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी रांची इथल्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज दोषी ठरवलं, तर २४ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली .सुमारे २६ वर्षांपूर्वीच्या या खटल्यातली ही अंतिम सुनावणी असून चारा घोटाळ्यातल्या  चार प्रकरणांमध्ये त्यांना यापूर्वीच  दोषी ठरवण्यात आलं आहे.