भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील चार आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयाने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील हेनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर आणि ज्योती जगताप या चार आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सामाजिक सौहार्दाला बाधक आणि इतिहासाबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप तसंच भीमा कोरेगाव इथे दगडफेक आणि हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. हे सर्व आरोपी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत असं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे