युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धात युक्रेनचे ३५२ नागरिक ठार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धात युक्रेनचे ३५२ नागरिक ठार झाले असून यात १४ मुलंही आहेत, अशी माहिती युक्रेननं दिली आहे. याखेरीज १ हजार ६८४ नागरिक जखमी झाले असून यात ११६ मुलं आहेत.

रशियानं मात्र आपण केवळ युक्रेनच्या लष्करी आस्थापनांना लक्ष्य करत असून युक्रेनच्या नागरिकांना धोका नाही, असा दावा केला आहे. युक्रेनच्या गृह मंत्रालयानं सैन्यहानीबद्दल रविवारी कुठलीही माहिती दिली नाही. रशियानंही त्यांच्या सैन्यहानीबद्दल नेमके आकडे प्रसारित केले नाहीत.