युवक हे देशाचे भावी नेता आणि राष्ट्रनिर्माता - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युवक हे देशाचे भावी नेता आणि राष्ट्रनिर्माता आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल केलं. चालू आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पांत उच्च शिक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदीसंदर्भात आयोजित वेबीनारला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते.

युवकांना सशक्त करणं म्हणजे देशाचं भविष्य बळकट करणं आणि यासाठीच या अर्थसंकल्पांत उच्च शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात आलं असल्याचं मोदी म्हणाले. यासाठी पाच महत्वाच्या मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात देशातील शिक्षण क्षेत्राचा विस्तार आणि दर्जेदार शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, कौशल्य विकासाअंतर्गत उद्योगक्षेत्राला जोडता येतील अशा डिजीटल कौशल्याला चालना देणं, शहरी नियोजन आणि रचना क्षेत्रातील भारताचा प्राचीन अनुभव आणि ज्ञान यांचा शैक्षणिक क्षेत्रात समावेश करणं यासह या क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीयकरणामुळे देशविदेशातील विद्यापीठं भारतात येतील, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.

गीफ्टसीटी, फीनटेक यांसारखे उद्योगाशी संलग्न संस्थांना चालना, AVGC अर्थात अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक, अशा विविध कौशल्यांमध्ये मोठ्या जागतिक बाजारपेठेसह रोजगाराची प्रचंड क्षमता आहे. यासाठी या क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पांत करण्यात आला असल्यांचं मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं.  

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image