भारताचे हॉकी गोलरक्षक पी.आर.श्रीजेश यांची ‘वर्ल्ड गेम्स ऍथलिट ऑफ द ईयर’ म्हणून निवड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे हॉकी गोलरक्षक पी.आर. श्रीजेश यांची २०२१ या वर्षातल्या उत्तम कामगिरीबद्दल ‘वर्ल्डी गेम्स ऍथलिट ऑफ द ईयर’ म्हणून निवड झाली आहे. हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळवणारे ते दुसरे भारतीय आहेत. भारतीय महिला हॉकी कर्णधार रानी रामपाल हा सन्मान मिळवणारी पहिली भारतीय होती. २०१९ सालच्या कामगिरीबद्दल तिला सन्मानित करण्यात आलं होतं. श्रीजेश भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि टोकियो ओलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य आहेत.अंतराष्ट्रीय हॉकी संघानं या सन्मानासाठी त्यांच्या नावाशी शिफारस केली होती. 

 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image