देशाबाहेर जा-ये करणारी नियमित प्रवासी विमानवाहतूक आणखी काही काळ बंद राहणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाबाहेर जा-ये करणारी नियमित प्रवासी विमानवाहतूक आणखी काही काळ बंद राहील असं नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने सांगितलं आहे. कोरोना महामारीमुळे 23 मार्च 2020 पासून नियमित उड्डाणं बंदच आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवे दिशानिर्देश 14 फेब्रुवारीला जारी केले आहेत.