दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजना कार्यान्वित करा : वैशाली काळभोर

 

पिंपरी : दिव्यांग व्यक्तींसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभाग विभागाद्वारे अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. यामध्ये संत गाडगे महाराज दिव्यांग कल्याणकारी योजनेद्वारे दोन दिव्यांग व्यक्तीने अदिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास अशा जोडप्यांना एक लाख रुपये रोख रक्कम आणि दिव्यांग व दिव्यांग अशा व्यक्तीने विवाह केल्यास त्यांना रोख दोन लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. मात्र या योजनेची अंमलबाजवणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अद्याप केली नाही. त्यामुळे शेकडो दिव्यांग व्यक्ती या लाभापासून वंचित राहत आहेत तरी ही योजना पूर्ण क्षमतेने ताबडतोब सुरू करावी अशी मागणी ज्येष्ठ नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिंपरी चिंचवड महिला माजी शहराध्यक्ष वैशाली काळभोर यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी वैशाली काळभोर यांनी आयुक्त पाटील यांना दिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, दिव्यांग व्यक्ती बरोबर अदिव्यांग व्यक्तीने विवाह केल्यास त्यांना प्रोत्साहनपर एक लाख रुपये अर्थसहाय्य देणे तसेच दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास अशा नवविवाहित जोडप्याला संसारात मदत व्हावी या उद्देशाने एकरकमी दोन लाख रुपये अर्थसहाय्य देणे अशी नवीन योजना पिंपरी चिंचवड महानगरपालिके द्वारे सुरु करण्यासाठी 12 जून 2019 रोजी मान्यता देण्यात आलेली आहे. अद्यापही ही योजना सुरू झालेली नाही. तरी या योजनेपासून दिव्यांग व्यक्ती वंचित राहणार नाहीत याकरिता आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात ही योजना लवकरात लवकर सुरू करून दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशीही मागणी नगरसेविका वैशाली ताई काळभोर यांनी या पत्रात केली आहे.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image