जपानमध्ये एकाच दिवशी एक लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये काल एकाच दिवशी एक लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात काल एक लाख 949 रुग्ण आढळले असून जपानमध्ये एकाच दिवशी प्रथमच इतके रुग्ण आढळले आहेत. काल आढळलेल्या एकून रुग्णांपैकी एक पंचमांशहून अधिक रुग्ण राजधानी टोकियोमध्ये आढळले आहेत.

दरम्यान, कोरोना संसर्गाविरोधातल्या लढाईला बळ देण्यासाठी सात गरजू देशांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन कोटी मात्रा पुरविण्याचा निर्णय जपान सरकारनं घेतला आहे. त्याशिवाय, संयुक्त राष्ट्रांच्या कोव्हॅक्स सुविधेमार्फत 13 देशांना एक कोटी 10 लाख मात्राही जपान पुरवणार आहे.