वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेसाठी माहितीचे अद्ययावतीकरण करणे अनिवार्य

  महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे सांस्कृतिक संचालनालयाचे आवाहन

मुंबई : राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन १९५४-५५ पासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविली जाते. आजपर्यंत या योजनेचा हजारो साहित्यिकांनी लाभ घेतला आहे. शासनाकडून मानधन घेणाऱ्या लाभार्थींची माहिती संकलित करुन अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याबाबत माहिती सादर करण्यासाठी राज्यातील कलावंतांना दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

ज्या कलावंतांनी अद्याप माहिती सादर केलेली नाही, त्यांनी कलाकाराचे छायाचित्र, कलाकाराचे संपूर्ण नाव, स्वतः की वारस, पत्ता, निवड वर्ष, कलाप्रकार, आधार कार्ड, बँकेचे नाव व शाखा, खाते क्रमांक, आय.एफ.एस.सी. कोड, पॅन कार्ड असल्यास तसेच आधार कार्ड व पासबुक यांच्या सत्यप्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. तालुका स्तरावर गट विकास अधिकारी पंचायत समिती येथे, जिल्हास्तरावर समाज कल्याण कार्यालय, जिल्हापरिषद येथे व मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील कलावंतांनी सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, महाराष्ट्र शासन, विस्तारभवन, महात्मा गांधी मार्ग, मंत्रालय मुंबई ४०००३२ या कार्यालयात जमा करावेत. ज्या कलावंतांची माहिती प्राप्त होणार नाही त्यांचे माहे मार्च २०२२ पासून मानधन रोखण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.