परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी घेतली फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्याँ- यीव लु दरयां यांची भेट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्याँ - यीव लु दरयां यांची पॅरिस इथं भेट घेऊन चर्चा केली. उभय राष्ट्रांदरम्यान कोविड काळातल्या सहकार्याविषयी दोघांनीही समाधान व्यक्त केलं आणि परस्पर संबंध बळकट करण्याविषयी सहमती दर्शवली. सागरी व्यापार क्षेत्रात भारत फ्रान्स भागीदारीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने बहुआयामी प्रयत्न करण्यासाठीच्या धोरण आराखड्याला यावेळी मान्यता देण्यात आली. क्रीडाक्षेत्रात द्विपक्षीय करार लौकरच करण्यावरही त्यांचं एकमत झालं.