प्रधानमंत्री गती शक्ती योजनेच्या राष्ट्रीय योजने २२ नवीन राष्ट्रीय महामार्ग उभारले जाणार
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गती शक्ती योजनेच्या राष्ट्रीय योजनेअंतर्गत रस्ते विकास आणि महामार्ग मंत्रालय २२ नवीन राष्ट्रीय महामार्ग, २३ प्रमुख पायाभूत सुविधा योजना, आणि ३५ मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स पार्क विकसित करणार आहे.
दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग, अहमदाबाद-धोलेरा द्रुतगती महामार्ग, दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती महामार्ग आणि बंगळुरू-चेन्नई द्रुतगती महामार्ग या प्रकल्पांचा या योजनेत समावेश आहे. तर निर्माण होत असलेल्या काही महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांमध्ये लडाखमधला झोजिला बोगदा, आंध्रप्रदेशमध्ये कृष्णापत्तनम बंदराला जोडणारे रस्ते आणि अरुणाचल प्रदेशातल्या लालपुल-मनमाओ रस्त्याचं दुपदरीकरण याचा समावेश आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.