केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घरावर मोर्चा काढणाऱ्या १०० काँग्रेस कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हे दाखल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महाराष्ट्र काँग्रेससंदर्भात कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत, औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काल केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं कार्यकर्त्यांनी क्रांती चौकाजवळ रस्त्यावरचं ठिय्या आंदोलन करत, घोषणाबाजी केली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी राज्याची माफी मागावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांच्यासह १०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.