इस्लामिक स्टेट चा सर्वोच्च नेता अबू इब्राहीम अल हाशिमी अल कुरैशी अमेरिकेच्या विशेष दलाच्या दहशतवादविरोधी कारवाईत ठार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विशेष सुरक्षा पथकाबरोबर सिरिया इथं झालेल्या चकमकीत आयसीसचा म्होरक्या अबू ईब्राहीम अल हश्मी अल कुरैशी ठार झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी काल ही माहिती दिली. अमेरिकन फौजांनी या म्होरक्याला घेराव घातल्यानंतर त्यानं स्वत:ला आणि त्याच्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांना बाँबनं उडवलं. २०१९ मध्ये अमेरिकेच्या फौजांनी ठार अबू बकरला मारल्यानंतर कुरैशीला आयसीसचा प्रमुख बनवण्यात आलं होतं. या चकमकीत चार नागरिक आणि ५ सैनिकांचाही मृत्यू झाला, अशी माहिती पेंटागॉनचे प्रवक्ता जॉन कर्बी यांनी दिली. या चकमकीत ५० कमांडोनी भाग घेतला.